Home Regional नाशकात Lockdown मध्ये पोलिसांची मिसळ पार्टी, अधिकाऱ्यांकडूनही कोरोना नियमांना हरताळ

नाशकात Lockdown मध्ये पोलिसांची मिसळ पार्टी, अधिकाऱ्यांकडूनही कोरोना नियमांना हरताळ

214
After Odisha and Punjab, Rajasthan Extends Lockdown Till End of Month as COVID-19 Spreads

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात नागरिकांमध्ये शिस्त राहावी याची जबाबदारी पोलिसांवर (Police) आहे. नाशकात पोलिसांना त्यासाठी सुरू केलेल्या कारवाईचे व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. पण रविवारी समोर आलेल्या एका प्रकारानं नाशिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात येत आहे. नाशिकमध्ये कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिसळ पार्टीच्या (Misal party) कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांची मात्र पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं.

कोरोनाच्या संकट काळामध्य पोलीस दलातील कर्मचारी हे 24 तास कशाचीही पर्वा न करता काम करत असल्याचं पाहायला मिळालं. त्यानिमित्त प्रशासनाच्या वतीनं पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि मिसळ पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलिसांच्या बरोबरीनं कोरोनाच्या संकटात काही नागरिकही काम करत आहोत. विशेष पोलिस अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मात्र या कार्यक्रमात कोरोनाचे नियम पाळले गेले नसल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. असं असूनही या कार्यक्रमात नियम पाळले गेले नसल्याचा आरोप होत आहे. पोलिस सामान्य नागरिकांना संचारबंदीत फिरताना दंडुक्याचा प्रसाद देत आहेत. तसंच कार्यक्रमात 20 पेक्षा अधिक लोकांना परवानगी देत नाही. मग पोलिसांच्या कार्यक्रमाला नियम नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.