Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं राज्यातील कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा विचार सरकार करत आहे. सूत्रांच्य माहितीनुसार राज्यात टप्प्याटप्याने अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात करण्याचा विचार सुरू आहे. जर प्लॅन यशस्वी ठरला तर १ जूनपासून महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करेल. Read More: 3 Best Disinfectant Spray of India Amid Pandemic
मागील वेळेप्रमाणे सरकार प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून पाऊल टाकत आहे. अनलॉकबाबत अद्याप अधिकृत कोणतीही भूमिका ठरली नाही. परंतु अनलॉकबाबत अनेक पर्याय समोर येत आहेत. ज्यावर सरकार लवकरच कार्यवाही करेल.
मुंबईत मागील काही दिवसांत नवीन रुग्णांची संख्या दीड हजारांवर आली आहे. बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के आहे. अशावेळी मुंबईत कोरोनाचं संकट कमी होताना दिसत आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्य सरकार १ जूननंतर लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतील २४ वार्डातील आता फक्त १० वार्डात कन्टेन्मेंट झोन आहेत. तर १४ वार्ड कन्टेन्मेंट झोनमुक्त झालेत. ७ वार्डात एकही मायक्रो कन्टेन्मेंट झोन नाही. तर एका वार्डात एकही बिल्डिंग सील नाही. मुंबईत आता ४४ कन्टेन्मेंट झोन आहेत. ज्यात २.३३ लाख लोक राहतात.
कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढल्यानंतर २,७४७ कन्टेन्मेंट झोनमुक्त करण्यात आले. सूत्रांनुसार महाराष्ट्रात चार टप्प्यात अनलॉक सुरू होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकानांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मान्सूनमुळे सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे. Read More: 5 Best Face Wash for Men in India