Home Regional या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मिळतील 4950 रुपये, जाणून घ्या या...

या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मिळतील 4950 रुपये, जाणून घ्या या स्किमबाबत

105
Easy ways to Make money Quickly

Post Office Scheme: अनेकांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायची इच्छा असते, जिथे गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्सही मिळतील आणि गुंतवणूक सुरक्षितही राहील. या हिशोबाने पोस्ट ऑफिसची (Post office) स्किम अतिशय फायदेशीर ठरते. पोस्ट ऑफिसची एक अशी स्किम आहे Monthly Income Plan, ज्यात एका निश्चित कालावधीमध्ये चांगले रिटर्न्सही मिळतील आणि त्याशिवाय दर महिन्यालाही एक निश्चित रक्कम मिळेल.

Monthly Income Plan –

पोस्ट ऑफिसच्या या Monthly Income Plan ची विशेष बाब म्हणजे, याचं व्याज प्रत्येक वर्षी जोडलं जातं. या स्किममध्ये Joint Account ओपन केलं आणि त्यात 9 लाख रुपये एकत्रच जमा केले, तर दर महिन्याला 4950 रुपये मिळतील. मुख्य गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 6.6 टक्क्यांच्या दराने 59,400 रुपये होतं. त्यानुसार व्याजाची मासिक रक्कम 4950 रुपये होते, ही रक्कम दर महिन्याला घेऊ शकता.

जी रक्कम दर महिन्याला मिळेल, ते केवळ व्याज असेल आणि मूळ गुंतवणूक तशीच राहिल. Maturity झाल्यानंतर ही रक्कम काढू शकता.

4950 रुपयांचं मासिक व्याज 5 वर्षांच्या Maturity हिशोबाने मिळत राहिल. यात Maturity वाढवताही येऊ शकते. यात सिंगल अकाउंट ओपन केल्यास जास्तीत-जास्त 4.5 लाख रुपये जमा करू शकता आणि जॉईंट अकाउंट ओपन केल्यास, 9 लाख रुपये जमा करू शकता.